Ruchika Jadhav
दिवाळीमध्ये घरोघरी फराळ बनवायला सुरूवात झाली आहे.
सर्व गोड पदार्थ असल्याने अनेकांना चकली जास्त खावी वाटते.
दिवाळीत घराघरात चकलीला जास्त पसंती असते.
चकली बनवण्यासाठी भाजणीचे पिठ तयार करून घ्यावे.
यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे भाजणीचे पीठ देखील वापरू शकता.
भाजणीच्या पिठात चकली कुरकुरीत व्हावी म्हणून तेलाचे मोहन टाकावे आणि पीठ साध्या पाण्यात मळून घ्यावे.
पीठ मळताना त्यात तुमच्या आवडीनुसार तिखट, मिठ आणि तिळ टाकावेत.
चकली नेहमी मिडिअम आंचेवर तळावी. तेल जास्त तापले असल्यास चकल्या करपू शकतात.