Diwali Biscuits Recipe : दिवाळी फराळात यंदा काहीतरी हटके! घरीच बनवा बाजारासारखे कुरकुरीत बिस्किट्स, सोपी रेसिपी ट्राय करा

Shreya Maskar

दिवाळी स्पेशल बिस्किट्स

दिवाळी स्पेशल बिस्किट्स बनवण्यासाठी मैदा, पिठीसाखर, तूप, बेकिंग पावडर, वेलची पूड, दूध, मीठ आणि बदाम इत्यादी साहित्य लागते.

Diwali Special Biscuits | pinterest

बिस्किट्स

बिस्किट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये तूप आणि पिठीसाखर एकत्र करून चांगले फेटून घ्या. मिश्रण हलके आणि मऊ झाले की त्यात मैदा, बेकिंग पावडर, वेलची पूड आणि मीठ घाला.

Biscuits | pinterest

दूध

सर्व साहित्य एकत्र करून मऊसर कणीक तयार करा. कणीक कोरडी वाटल्यास थोडे दूध घाला. कणीक खूप घट्ट मळू नका. कणकेचा गोळा लाटून घ्या.

milk | pinterest

काजू-बदाम

बिस्किटांच्या साच्याने किंवा छोट्या वाटीच्या मदतीने गोल अथवा आवडीचे आकार कापून घ्या. वरून काजू किंवा बदामाचे तुकडे लावा.

Cashews and almonds | pinterest

बिस्किटे बेक करा

ओव्हन १७०°C वर प्रीहीट करा. बिस्किटे बेकिंग ट्रेमध्ये थोड्या अंतरावर ठेवा आणि साधारण १२–१८ मिनिटे बेक करा. कडा किंचित सोनेरी झाल्या की बाहेर काढा. ओव्हननुसार वेळ बदलू शकतो.

Bake the biscuits | pinterest

बिस्किटे स्टोर करा

बिस्किटे पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ती खुसखुशीत होतात. त्यानंतर हवाबंद डब्यात साठवा.

Store biscuits | pinterest

टिप्स

बिस्किट्स खुसखुशीत होण्यासाठी कणीक जास्त मळू नका अन्यथा बिस्किटे कडक होऊ शकतात. बिस्किटे जास्त वेळ बेक केल्यास ती करपण्याची शक्यता असते.

Tips | pinterest

बिस्किटांचे प्रकार

नानकटाई बिस्किटे, चॉकलेट बिस्किटे, जिरे बिस्किटे, गव्हाच्या पिठाची बिस्किटे, ड्रायफ्रूट बिस्किटे

Types of Biscuits | pinterest

NEXT : दिवाळीत बनवा कुरकुरीत खारी शंकरपाळी; चहासोबत खाण्याची मजाच वेगळी, वाचा झटपट होणारी रेसिपी

Khari Shankarpali Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...