Manasvi Choudhary
सर्वत्र दिवाळी सणाची तयारी सुरू आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात दिवाळीच्या अनेक वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
तुम्हालाही दिवाळीची शॉपिंग करायची असल्यास ठाण्यातील प्रसिद्ध बाजांराना भेट द्या.
ठाण्यात दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी गर्दी झाली आहे. स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी लोक जमले आहेत.
दिवाळीनिमित्त, घर सजावटीच्या वस्तू, दिवे, पणते, लक्ष्मीची पाऊले या सर्व वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही ठाणे स्टेशन परिसरात खरेदी करा.
तुम्हाला जर बजेटमध्ये स्टायलिश कपडे घ्यायचे असतील तर नौपाडा रोड येथील दुकांनाना भेट द्या. येथे तुम्हाला ट्रेंडी कलेक्शनमध्ये साड्या, कुर्ते, ड्रेस, शूज बजेटमध्ये उपलब्ध असतील.
दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी लायटिंग, कंदील हवे असतील तर तुम्ही राम मारूती रोड परिसराला भेट द्या.
दिवाळी शॉपिंगसाठी राम मारूती रोड हा प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला लाइट्स, घर सजावटीच्या सर्व वस्तू उपलब्ध होतील.
ठाण्यातील गांवदेवी मंदीर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्हाला कपड्यांची खरेदीपासून ते सजावटीपर्यंतच्या सर्व गोष्टी मिळतील.