Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

Manasvi Choudhary

दिवाळी

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण आला आहे. दिवाळीपूर्वी सर्वजण घराची साफसफाई करतात.

Diwali | pinterest

सुख- समृद्धी येते

दिवाळीपूर्वी घराची व्यवस्थित स्वच्छता केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी व संपत्ती नांदते.

Diwali | pinterest

सोप्या गोष्टी लक्षात ठेवा

दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना काही महत्वाच्या गोष्टींकडे देखील लक्ष देणे महत्वाचे आहे.

Diwali Cleaning Tips | pinterest

खिडक्या आणि दारांमधील भेगा भरा

जर वारंवार साफसफाई करूनही घरात सतत धूळ साचत असेल, तर खिडक्या आणि दारांच्या कडांवरील छोट्या-मोठ्या भेगा सिलिकॉन किंवा पुट्टीच्या सहाय्याने बंद करा. यामुळे बाहेरील धूळ थेट घरात येण्यापासून रोखता येते.

Window | Yandex

दाराखालची फट बंद करा

मुख्य दाराखाली किंवा खोल्यांच्या दारांखाली मोठी फट असेल, तर त्यातून उंदीर, झुरळे घरात शिरू शकतात तसेच मोठ्या प्रमाणावर धूळ येते. या समस्येसाठी 'डोअर गार्ड' किंवा रबर स्ट्रिपचा वापर करा.

Diwali Cleaning Tips

घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करा

वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वार हे सकारात्मक ऊर्जेचे ठिकाण मानले जाते ते स्वच्छ करा.

Diwali Cleaning Tips

मॅट आणि कार्पेटची विशेष स्वच्छता:

घरातील गालिचे आणि डोरमॅट्सवर सर्वाधिक धूळ साचलेली असते. दिवाळीपूर्वी हे सर्व साहित्य कडक उन्हात वाळवून किंवा व्हॅक्यूम क्लीनरने पूर्णपणे स्वच्छ करून घ्या.

Diwali Cleaning Tips | Canva

पलंगामागे आणि जड फर्निचरखालील धूळ काढा

खोलीची साफसफाई करताना आपण सहसा समोरची जागा साफ करतो, पण पलंगाच्या मागे किंवा मोठ्या कपाटाखाली वर्षभर साचलेली जळमटे आणि धूळ तशीच राहते. फर्निचर थोडे सरकवून ही घाण स्वच्छ करा.

Diwali Cleaning Tips | Google

NEXT: Vajarasana Benefits: जेवल्यानंतर वज्रासनात बसण्याचे चमत्कारिक फायदे! पचनक्रिया आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

Vajarasana Benefits
येथे क्लिक करा...