Shreya Maskar
दिवाळी किल्ला बनवण्यासाठी माती, पाणी, रंगीत दगड, सजावटीच्या वस्तू इत्यादी साहित्य लागते.
किल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम मोकळी जागा निवडा. जेथे तुम्ही मोठा किल्ला बनवू शकता. जिथे जास्त हवा देखील येणार नाही. म्हणजे तुमची सजावट चांगली राहील.
एक मातीचा ढीग भिजवून त्याला हळू हळू किल्ल्याचा आकार द्या. आकार नीट रेखीव येण्यासाठी पाण्याचा वापर करा.
लक्षात ठेवा तुम्हाला हलक्या हाताने किल्ला बनवायचा आहे, म्हणजे तो तुटणार नाही आणि झटपट बनेल.
किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आधी बनवा. भिजवलेल्या मातीला हाताने दाबून किल्ल्याच्या भिंती आणि बुरूज बनवा.
किल्ला सजवण्यासाठी रंगीत दगड, छोटे मनोरे, इतर सजावटीच्या वस्तू वापरा.
किल्ल्याला छोटा कंदील, तोरण लावा. किल्ल्यावर छोटे दिवे लावा. मुलांसोबत किल्ला बनवण्याचा आनंद घ्या.
सोशल मीडियावर किल्ला बनवण्याचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. त्यांच्या मदतीने किल्ला अजून खूप सुंदर बनेल.
किल्ला पूर्ण झाल्यावर लहान वृक्ष, मातीचे प्राणी आणि खेळणी आजूबाजूला ठेवा. थोडा गावाचे वातावरण बनवा.