Shreya Maskar
दिवाळीत रांगोळी आणि दिव्यांनी घर सजवा. ठिपक्यांची किचकट रांगोळी काढता येत नसेल तर फुलांची रांगोळी काढा.
आजकाल रांगोळीमध्ये रंगापेक्षा फुलांचा वापर जास्त केला जातो. तुम्ही झेंडूची फुले, गुलाबाच्या पाकळ्यांनी रांगोळी सजवू शकता.
आंब्याच्या पानांची देखील रांगोळी काढू शकता. फुलांच्या रांगोळीचे विविध फोटो , व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.
रांगोळी फुलांनी सजवण्यासाठी छोट्या फुलांचा वापर करा. तसेच फुलं ताजी टवटवीत राहण्यासाठी त्यावर वारंवार पाणी शिंपडा.
तुम्ही सुंदर फुलांचा वापर करून संस्कार भारती रांगोळी काढू शकता. यात वेळ जास्त लागले पण रांगोळी छान तयार होईल.
फुलांची रांगोळी काढताना रंगसंगती, आकार आणि डिझाइन यांकडे खूप विशेष लक्ष द्या. तसेच फुलांची रांगोळी काढण्यासाठी मोठ्या जागेची निवड करा.
रांगोळीमुळे घरात सकारात्मकता, सुख-समृद्धी नांदते. तसेच घराच्या सौंदर्यात भर पडते.