Manasvi Choudhary
दिवाळीत प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असते.दिवाळीच्या चौथ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.
यंदा भाऊबीज १५ नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी आहे.
बहीण-भावांच्या नात्यांला समर्पित करणारा हा सण असतो.
भावाच्या दिर्घायुष्यासाठी बहीण भावाला औक्षण करते आणि भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि भेटवस्तू देतो.
बहिणीला मेकअपची आवड असेल तर तुम्ही तिला मेकअप किट भेटवस्तू देऊ शकता.
मुलींना वेगवेगळ्या डिझायनर कपड्याची आवड असते. यामुळे तुम्ही बहिणीला स्टायलिश कपडे भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
बहिणींना तुम्ही वॉलेट भेटवस्तू म्हणून देऊ शकता. नवीन स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स दिल्याने बहीण नक्कीच खूश होईल.