Shreya Maskar
दिवाळी हा सण म्हणजे सुंदर पारंपरिक कपडे, आकर्षक दागिने आणि स्टायलिश लूक. दिवाळीत अनेक सण येतात. उदा. लक्ष्मीपूजा, दिवाळी पाडवा, भाऊबीज. दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी हे आउटफिट नक्की ट्राय करा.
दिवाळी पार्टीसाठी सिल्क साडीची निवड करा. यात कांजीवरम, बनारसी किंवा पैठणी साडी खूप सुंदर दिसेल. गोल्ड ज्वेलरी, नथ आणि अंबाडा घालून लूक पूर्ण करा.
अनारकली सूटमध्ये एलिगंट आणि पारंपरिक लूक मिळतो. एम्ब्रॉयडरी, गोटा-पट्टी किंवा गोल्डन वर्क असलेला अनारकली सूट दिवाळी पार्टीसाठी निवडा.
दिवाळीच्या खास सेलिब्रेशनसाठी मिरर वर्क, सिक्विन किंवा एम्ब्रॉयडरी असलेला घागरा-चोळी ट्राय करा. यासोबत स्टेटमेंट इअररिंग्स आणि आकर्षक क्लच वापरा.
मॉडर्न आणि कम्फर्टेबल स्टाइल आवडणाऱ्या महिलांसाठी एथनिक को-ऑर्ड सेट चांगला पर्याय आहे. सिल्क, ब्रोकेड किंवा पारंपरिक प्रिंट्स असलेले सेट दिवाळीसाठी निवडा.
दिवाळी पाडवा किंवा भाऊबीजेसाठी नऊवारी साडी नेसून हा सुंदर पारंपरिक लूक करा. नथ, ठुशी, हिरव्या बांगड्या आणि गजरा यांसोबत अस्सल महाराष्ट्रीयन लूक तयार करा.
हलका आणि कम्फर्टेबल लूक हवा असल्यास एम्ब्रॉयडरी कुर्ती, प्लाझो आणि सुंदर दुपट्टा घाला. घरातील पूजा किंवा नातेवाइकांना भेटण्यासाठी हा पोशाख योग्य आहे.
हलका आणि नाजूक लूक हवा असल्यास चिकनकारी सूट निवडा. पांढरा, पीच, पावडर ब्लू किंवा पेस्टल पिंक रंगाचा सूट मोत्यांचे दागिने आणि सॉफ्ट मेकअपसोबत सुंदर दिसतो.