Anarkali Suit Design : चंद्र प्रकाशात खुलून दिसेल तुमचा लूक! कोजागिरीसाठी पाहा अनारकली सूटचे ७ स्टायलिश अन् ट्रेंडी डिझाइन्स

Shreya Maskar

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमेला म्हटली की, महिलांचा साज श्रृंगार आलाच. या दिवशी साडी किंवा लेहेंग्याऐवजी काहीतरी वेगळं ट्राय करायचे असेल तर अनारकली सूट उत्तम ऑप्शन आहे.

Kojagiri Purnima | pinterest

व्हाइट अनारकली सूट

कोजागिरीच्या चंद्र प्रकाशात पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाइट रंगाचा अनारकली सूट अतिशय सुंदर दिसतो. सिल्व्हर एम्ब्रॉयडरी, मोत्यांचे कानातले आणि नाजूक बांगड्यांसोबत हा लूक अधिक खुलून दिसेल.

White Anarkali Suit | pinterest

फ्लोरल प्रिंट अनारकली सूट

फ्लोरल प्रिंट अनारकली ही आजकालची फॅशन आहे. पेस्टल, पीच, लॅव्हेंडर किंवा पिवळ्या रंगातील फ्लोरल डिझाइन्स आकर्षक दिसतात. त्यासोबत छोटे झुमके, साध्या बांगड्या आणि एथनिक जुत्ती घालून सुंदर लूक तयार करता येईल.

Floral Print Anarkali Suit | pinterest

पेस्टल पिंक अनारकली सूट

सॉफ्ट आणि नाजूक लूक हवा असेल तर पेस्टल पिंक अनारकली सूट निवडा. हलक्या रंगाच्या या आउटफिटवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी किंवा लेस वर्क सुंदर दिसते.

Pastel Pink Anarkali Suit | pinterest

रॉयल ब्लू अनारकली सूट

कोजागिरीच्या संध्याकाळी उठून दिसायचं असेल, तर रॉयल ब्लू रंगाचा अनारकली सूट निवडा. गोल्डन किंवा सिल्व्हर एम्ब्रॉयडरी असलेला हा सूट सणासुदीच्या कार्यक्रमासाठी उत्तम आहे.

Royal Blue Anarkali Suit | pinterest

एमराल्ड ग्रीन अनारकली सूट

हिरव्या रंगातील अनारकली सूट पारंपरिक आणि रिच लूक देतो. विशेषतः गोल्डन झरी वर्क, कुंदन डिटेलिंग किंवा सुंदर बॉर्डर असलेला सूट कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी छान दिसेल.

Emerald Green Anarkali Suit | pinterest

पर्पल अनारकली सूट

जांभळ्या रंगाचा अनारकली सूट स्टायलिश आणि वेगळा लूक देण्यासाठी उत्तम आहे. त्यावर सिल्व्हर एम्ब्रॉयडरी, ऑक्सिडाइज्ड झुमके किंवा कुंदनचे दागिने सुंदर दिसतील.

Purple Anarkali Suit | pinterest

गोल्डन एम्ब्रॉयडरी अनारकली सूट

कोजागिरीच्या पार्टीसाठी थोडा ग्लॅमरस लूक हवा असेल, तर गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेला अनारकली सूट निवडा. बेज, शॅम्पेन, आयव्हरी किंवा मरून रंगावरील गोल्डन वर्क विशेष उठून दिसते.

Anarkali Suit with Golden Embroidery | pinterest

NEXT : दिवाळीत साडी नेसण्याची कटकट विसरा! पाहा प्री-ड्रेप्ड साडीचे लेटेस्ट कलेक्शन, दिसाल एकदम ग्लॅमरस!

Pre Draped Saree | AI PHOTO
येथे क्लिक करा...