Pre Draped Saree : दिवाळीत साडी नेसण्याची कटकट विसरा! पाहा प्री-ड्रेप्ड साडीचे लेटेस्ट कलेक्शन, दिसाल एकदम ग्लॅमरस!

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, सुंदर दागिने आणि हटके लूक करण्याची तयारी सुरू होते. मात्र, साडी नेसायला वेळ लागत असेल किंवा परफेक्ट निऱ्या काढणं कठीण वाटत असेल, तर प्री-ड्रेप्ड साडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Diwali | pinterest

रफल प्री-ड्रेप्ड साडी

रफल्समुळे साडीला मॉडर्न आणि आकर्षक लूक मिळतो. दिवाळी पार्टीसाठी पेस्टल पिंक, पीच किंवा वाइन रंगाची रफल साडी निवडू शकता. यासोबत मिनिमल ज्वेलरी आणि हिल्स छान दिसतात.

Ruffle Pre-Draped Saree | pinterest

बेल्ट स्टाइल प्री-ड्रेप्ड साडी

साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट बेल्ट लावल्यामुळे लूक अधिक स्टायलिश दिसतो. विशेषतः भरजरी साडी किंवा प्लेन साडीवर एम्ब्रॉयडरी असलेला बेल्ट सुंदर दिसू शकतो.

Belt Style Pre-Draped Saree | pinterest

धोती स्टाइल प्री-ड्रेप्ड साडी

पारंपरिक साडीला वेस्टर्न टच द्यायचा असेल, तर धोती स्टाइल साडीचा पर्याय निवडा. दिवाळी गेट-टुगेदर किंवा मित्रमैत्रिणींसोबतच्या पार्टीसाठी हा लूक उठून दिसतो.

Dhoti Style Pre-Draped Saree | pinterest

केप स्टाइल प्री-ड्रेप्ड साडी

साडीवर केप डिझाइन असल्यामुळे लुकला वेगळीच शोभा येते. लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीच्या खास कार्यक्रमासाठी हा डिझायनर लूक निवडता येईल.

Cape Style Pre-Draped Saree | pinterest

सिक्विन प्री-ड्रेप्ड साडी

चमकदार सिक्विन साडी दिवाळीच्या रात्रीच्या पार्टीसाठी आकर्षक पर्याय आहे. गोल्डन, सिल्व्हर, शॅम्पेन किंवा ब्लॅक रंग निवडून स्टेटमेंट इअररिंग्ससोबत लूक पूर्ण करा.

Sequin Pre-Draped Saree | pinterest

सिल्क प्री-ड्रेप्ड साडी

पारंपरिक आणि रॉयल लूक आवडत असेल, तर सिल्क प्री-ड्रेप्ड साडी निवडा. गोल्डन बॉर्डर, पारंपरिक ब्लाउज आणि ठसठशीत दागिन्यांसह ही साडी लक्ष्मीपूजन व भाऊबीजेसाठी सुंदर दिसते.

Silk Pre-Draped Saree | pinterest

पँट स्टाइल प्री-ड्रेप्ड साडी

पँट स्टाईलची प्री-ड्रेप्ड साडी हा आधुनिक फॅशनमधील ट्रेंडी पर्याय आहे. साडीचा पदर आणि चुण्या आधीच शिवलेल्या असतात आणि पेटीकोटऐवजी आतमध्ये स्टायलिश पँट किंवा ट्राउझर घातली जाते.

Pant Style Pre-Draped Saree | pinterest

NEXT : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

Carpet Cleaning | AI PHOTO
येथे क्लिक करा...