Diwali Faral : लाडू-करंजी विसरा! यंदा दिवाळीत फराळात बनवा 'या' ७ हटके गोड रेसिपी, जिभेवर चव रेंगाळत राहील

Shreya Maskar

दिवाळी फराळ

दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांमध्ये आवर्जून लाडू, शंकरपाळी आणि करंजी बनवली जाते. यंदा काहीतरी हटके म्हणून एकदा या रेसिपीज ट्राय करा.

Diwali snacks | pinterest

खजूर-अंजीर ड्रायफ्रूट बर्फी

खजूर, अंजीर, बदाम, काजू आणि पिस्ता यांचा वापर करून ही पौष्टिक आणि नैसर्गिक गोडवा असलेली बर्फी तयार केली जाते. साखरेचा वापर न करताही ती चविष्ट लागते.

Date-fig dry fruit barfi | pinterest

चॉकलेट नारळाचे लाडू

किसलेला नारळ, कोको पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि चॉकलेट यांचा वापर करून हे स्वादिष्ट लाडू बनवता येतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो.

Chocolate Coconut Ladoo | pinterest

गुलाब पाकळ्यांची बर्फी

गुलाबाच्या ताज्या, वाळवलेल्या पाकळ्या, खवा, साखर आणि वेलची यांचा वापर करून सुगंधी बर्फी तयार केली जाते. दिसायला आकर्षक आणि चवीला खास असलेला हा पदार्थ दिवाळीसाठी उत्तम आहे.

Rose Petal Barfi | yandex

चॉकलेट काजू कतली

पारंपरिक काजू कतलीला चॉकलेटची चव देऊन ही हटके मिठाई तयार केली जाते. काजू पावडर, कोको पावडर आणि साखरेच्या पाकापासून बनणारी ही मिठाई चॉकलेटप्रेमींसाठी खास आहे.

Chocolate Nuts | pinterest

केशर नारळ लाडू

किसलेला नारळ, दूध, साखर, केशर आणि वेलची वापरून हे सुगंधी लाडू तयार केले जातात. केशरामुळे लाडूना सुंदर रंग आणि खास चव मिळते.

Saffron coconut laddus | pinterest

ड्रायफ्रूट करंजी

मैदा किंवा रव्याच्या आवरणात खवा, बदाम, काजू, पिस्ता, मनुका आणि साखरेचे सारण भरून गुजिया तयार केली जाते. तळून करून बनवता येणारा हा खुसखुशीत गोड पदार्थ दिवाळी फराळासाठी उत्तम आहे.

Dry Fruit Karanji | pinterest

अंजीर-खवा करंजी

अंजीर, खवा, सुका मेवा आणि वेलची यांचे स्वादिष्ट सारण मैद्याच्या पारीत भरून करंजी तयार केली जाते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असलेली ही करंजी पारंपरिक फराळाला वेगळी चव देते.

Fig-eating Karanji | pinterest

NEXT : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

Diwali Faral | AI PHOTO
येथे क्लिक करा...