Shreya Maskar
दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाची लगबग सुरू होते. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी असे पारंपरिक पदार्थ प्रत्येक घरात बनवले जातात. मात्र यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या फराळासोबत काहीतरी वेगळे आणि हटके पदार्थ बनवायचे असतील तर 'या' खास रेसिपी नक्की ट्राय करा.
नेहमीच्या तांदळाच्या, भाजणीच्या चकलीपेक्षा वेगळी चव अनुभवायची असेल, तर बटाटा चकली उत्तम पर्याय आहे. उकडलेल्या बटाट्यामुळे चकलीला मऊसर पोत मिळतो आणि चकली कुरकुरीत होते.
दिवाळीच्या फराळात रंग आणि पौष्टिकतेची भर घालायची असेल, तर पालक शेव नक्की बनवा. पालकामुळे शेवला आकर्षक हिरवा रंग मिळतो.
गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यांऐवजी यंदा नाचणीचे शंकरपाळे बनवून पाहा. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोहासारखी पोषक तत्त्वे असतात.
यंदा पारंपरिक खोबऱ्याच्या सारणाऐवजी गुलकंदाचे सारण वापरून करंजीला नवा स्वाद देता येईल. गुलाबाचा सुगंध आणि गोडसर चव यामुळे ही करंजी खास ठरते.
हलका, कुरकुरीत आणि चविष्ट फराळ हवा असेल, तर मखाना चिवडा एक उत्तम पर्याय आहे. मखान्यामध्ये फायबर आणि अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यास फायदेशीर ठरतात.
दिवाळीच्या फराळाला आकर्षक रंग द्यायचा असेल, तर बीटरूट पुरी चकली नक्की बनवा. बीटरूटमुळे चकलीला गुलाबी किंवा लालसर रंग मिळतो. दिसायला सुंदर आणि चवीला खमंग लागते.
हलके मुरमुरे, शेंगदाणे, डाळे आणि मसाल्यांची फोडणी यामुळे हा चिवडा चहासोबत खाण्यासाठी उत्तम आहे. कमी तेलातही हा पदार्थ तयार करता येतो.
NEXT : दिवाळी फराळात यंदा काहीतरी हटके! घरीच बनवा बाजारासारखे कुरकुरीत बिस्किट्स, सोपी रेसिपी ट्राय करा