Shreya Maskar
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत झटपट घराची साफसफाई करण्यासाठी सिंपल ट्रिक वापरा.
घराचा पंखा दिवाळीत स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. कारण त्यामुळे घरात फ्रेश हवा येते. तसेच घरात आलेल्या पाहुण्यांचे पहिले लक्ष पंख्यावर जाते.
पंख्याची सफाई करताना प्रथम त्यावर साचलेली धूळ आणि जळमट झाडूने बाजूला काढा. साफसफाई करताना तोंडाला मास्क लावा. म्हणजे धुळीचा त्रास होणार नाही.
पंख्यावरील तेलकट आणि चिकट घाण काढण्यासाठी लिक्विड क्लीनरचा वापर करा. वेगवेगळ्या पद्धतीचे लिक्विड क्लीनर बाजारात उपलब्ध आहेत.
तसेच तुम्ही घरातही होममेड क्लीनर बनवू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये इनो आणि शॅम्पू टाकून चांगले मिक्स करा. यांतील गुणर्धम काळेपणा दूर करतो.
आता हे लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि पंख्यावर शिंपडा त्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पंखा पुसून घ्या.
पंख्याच्या कोपऱ्यातील घाण काढण्यासाठी छोट्या ब्रशचा वापर करा. म्हणजे पंख्यावरील सर्व घाण निघून जाईल आणि पंखा नव्यासारखा चमकेल.
दिवाळीला कंदिल, तोरण आणि पणत्या लावून घर सजवा. घर सकारात्मक ठेवा. जेणेकरून सण उत्साहात साजरा होईल.