Shreya Maskar
दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी हा उत्साहाचा, आनंदाचा क्षण आहे. या सणामध्ये नाती नव्याने फुलू लागतात. सणासुदीला जवळच्या लोकांना आवर्जून भेट वस्तू द्या.
यंदा 22 ऑक्टोबर पाडवा सण साजरा केला जाणार आहे. पाडव्याला बायकोला काही खास भेटवस्तू द्या आणि तिला खुश करा. गिफ्ट ऑप्शन आताच नोट करा.
तुम्ही बायकोला पाडव्याला सुंदर अंगठी भेट करा. डायमंडचे दागिने खूप शोभून दिसतील आणि बायको देखील खूप खुश होईल. तुम्ही कस्टमाइज अंगठी देखील बनवू शकता.
सणासुदीला नेसता येईल अशी छान पारंपरिक साडी गिफ्ट करा. यात नऊवारी, पैठणी हे उत्तम पर्याय आहे. बायकोच्या आवडत्या रंगामध्ये साडी खरेदी करा.
तुम्ही स्पीकर, इयरफोन , वॉच, लॅपटॉप हे देखील गिफ्ट करू शकता. यात कमी जास्त पैशांमध्ये सुंदर व्हारायटी पाहायला मिळते.
आजकाल i phone ट्रेंड आहे. तुम्ही देखील बायकोला i phone गिफ्ट करा. दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन तुम्हाला कमी किंमतीमध्ये मिळतील.
तुमची बायको एखादा छंद जोपासत असेल तर त्यासंबंधित गिफ्ट द्या. उदा. गिटार यामुळे तिला असे वाटेल की तिच्या आवडीनिवडी तुम्हाला चांगल्या माहित आहे आणि तुम्ही तिला पाठिंबा देत आहात.
महिलांना मेकअप करायला खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही एक चांगल्या ब्रँडची मेकअप किट द्या. रोज साज श्रृंगार करताना बायकोला तुमची आठवण येईल.