Shreya Maskar
दिवाळीत घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवे लावण्याची प्रथा आहे. मात्र दिवाळीत नेमकं किती दिवे लावले शुभ मानले जाते यावर अनेक वेगवेगळी मते आहेत.
मोहरीच्या तेलाचा दिवे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घराती भांडणे कमी होतात. घरी पैसा टिकून राहतो.
दिवाळीत घरी दिवे लावून लक्ष्मीचे स्वागत केले जाते. घरातील अंधार आणि नकारात्मकता दूर होते. ज्यामुळे घर प्रकाशाने उजळते.
देवघर, किचन, तिजोरी खिडकी, तुळस आणि घराच्या प्रवेशद्वारावर दिवा आवर्जून लावावा. मातेचे दिवे घरात लावा.
दिवाळीत तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील शुभ आहे. ज्यामुळे तुळस देखील बहरते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.
दिवाळीच्या दिवसांत घर दिव्यांनी उजळवून काढा. दिवाळीत दिवे लावायला कोणताही निश्चित नियम नाही. मात्र वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीत 13 किंवा 15 दिवे घरात लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुखाची आणि संपत्तीची भरभराट होते.
घरात दिवे लावण्यापूर्वा मातीचे दिवे छान धुवून घ्या. त्यानंतर ते रंगांनी सजवा. जेणेकरून त्यांची शोभा वाढेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.