Shreya Maskar
आता सर्व जग टेक्नॉलॉजीवर चालते. त्यामुळे यंदा दिवाळीत भाऊबीजेला भावंडांना टेक-फ्रेंडली गिफ्ट्स द्या. काही सुंदर भेटवस्तूंचे ऑप्शन जाणून घ्या.
आजकाल स्मार्ट वॉचचा ट्रेंड पाहायला मिळतो. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये एक छान स्मार्ट वॉच खरेदी करा. भावाला खूप आवडेल.
वर्षभराचा मोबाइल रिचार्ज तुम्ही भावंडांच्या फोनला मारा. बहीण-भाऊ खुश होतील. तसेच नेहमी मोबाइल पाहताना तुमची आठवण काढतील. त्याचे काम सहज सोपं होईल.
आजकाल मोबाइल म्हणजे छोटा टिव्ही झाला आहे. फक्त या टिव्हीला ओटीटी मेंबरशिपची गरज आहे. ज्यामुळे सर्व चित्रपट, वेब सीरिज तुम्हाला सहज पाहता येतील.
तुमचे बहीण-भाऊ लहान असो वा मोठे इंटरनेट ही आताच्या जगात महत्त्वाची गरज झाली आहे. त्यामुळे वर्षभराच्या इंटरनेट कनेक्शनचे पैसे भरा. त्यांना घरबसल्या सर्व माहिती मिळेल.
आजकाल सर्वजण व्हिडीओ, रील बनवतात. कंटेंट शूट करतात. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा त्यांना गिफ्ट करा. तुम्ही यात आयुष्यातील छान क्षण कैद करू शकता.
तुम्ही मोबाइल चार्जर, मोबाइल ग्लास, मोबाइल कव्हर अशा अनेक मोबाइल एक्सेसरीज गिफ्ट करू शकता. कारण आजकालच्या मुलांना या गोष्टी खूप जास्त आवडतात.
तुमचे बजेट खूप जास्त असेल तर तुम्ही छान स्मार्ट फोन देखील बहीण-भावाला देऊ शकता. दिवाळीच्या सेलमध्ये किंमत कमी असेल. तसेच मोबाइल दिवाळीची एक आठवण म्हणून राहील.