Manasvi Choudhary
दिवाळीत भाऊबीजला या सणाला विशेष महत्व असते.
भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण आनंद आणि उत्साहाने भरलेला असतो.
यावर्षी १५ नोव्हेंबर २०२३ ला भाऊबीज साजरी केली जाईल. औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त १५ नोव्हेंबर दुपारी १.१० मिनिटे सुरू होईल आणि ३ वाजून २२ मिनिटांनी संपेल.
बहिण भावाचे औक्षण करते. यावेळी औक्षणाच्या ताटातील प्रत्येक गोष्टीला विशेष महत्व असते.
औक्षणाच्या ताटात कुंकू हे अत्यंत महत्वाचे आहे. ताटातील कुंकू भावाच्या कपाळावर लावल्याने हे दिर्घायुष्य लाभते असे मानले जाते.
हळद- कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
अक्षता म्हणजे औक्षवंत व्हा, दिर्घायुष्य लाभण्यासाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अक्षता पुजेच्या ताटात अखंड असाव्यात.
भावाच्या कपाळावर टिळा लावल्यानंतर नाण , सोनं आणि सुपारीने औक्षण करावे.
नारळाला श्रीफळ म्हटले जाते. भावाच्या आयुष्यात सुख- समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहिण करते.
दिवा हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. भाऊ औक्षवंत व्हावा यासाठी बहिण भावाला ओवाळते.
बहिण भावाच्या नात्याचा गोडवा कायम राहावा यासाठी आरतीच्या ताटात मिठाईला महत्व असते.