Diwali 2026 : दिवाळीपूर्वी घरातून 'या' ५ वस्तू काढून टाका; गरिबी होईल दूर अन् कायम राहील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळी येण्याआधी घराची साफसफाई सुरू करा. घरात सकारात्मकता आणि लक्ष्मीची कृपा कायम हवी असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरातून या वस्तू बाहेर काढा.

Diwali | pinterest

फाटलेले कपडे-तुटलेली भांडी

कपाटात वर्षानुवर्षे पडून असलेले फाटके, खराब झालेले, वापरात नसलेले कपडे वेगळे करा. चांगल्या स्थितीतील कपडे गरजू व्यक्तींना दान करू शकता. तडे गेलेली भांडी, झाकण नसलेले डबे आणि वापरण्यायोग्य नसलेले स्वयंपाकघरातील साहित्य बाजूला काढा.

broken utensils | pinterest

बंद पडलेली घड्याळे

घरात अजिबात बंद पडलेले घड्याळ ठेवू नका. घरात साचलेली वर्तमानपत्रे, रिकामे खोके आणि निरुपयोगी कागद रद्दीत द्या.

clock | goggle

फाटलेल्या चपला

तळ निघालेल्या चपला, तुटलेल्या सँडल आणि वापरण्यायोग्य नसलेले बूट घरात साठवून ठेवू नका. खराब आणि फाटलेले बूटही फेकून द्या.

torn shoes | pinterest

खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू

बंद पडलेले चार्जर, तुटलेल्या तारा आणि निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाकून द्या. ती सामान्य कचऱ्यात टाकू नका.

electronics | pinterest

सौंदर्यप्रसाधने

जुनी क्रीम, लिपस्टिक, परफ्यूम आणि इतर सौंदर्यप्रसाधनांची एक्सपायरी तपासा. मुदत संपलेली किंवा खराब झालेली उत्पादने वापरू नका.

Cosmetics | pinterest

निरुपयोगी वस्तू

तुटलेल्या बादल्या, खराब टोपल्या आणि वापरता न येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वेगळ्या करा. जुनी, धूळ साचलेली कृत्रिम फुले, तुटलेली तोरणे आणि खराब झालेली दिवाळीची सजावट तपासून निरुपयोगी वस्तू काढा.

stuff | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : पहिल्यांदाच भाजणीची चकली करताय? फॉलो करा स्टेप बाय स्टेप 'ही' रेसिपी

Diwali Chakli Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...