Diwali Killa Making : दिवाळीत सुंदर मातीचा किल्ला कसा बनवावा? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Shreya Maskar

दिवाळीचा किल्ला

दिवाळी म्हटलं की फराळ, पणत्या, आकाशकंदील आणि किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात किल्ले बनवण्याची खास परंपरा आहे.

Fort of Diwali | pinterest

किल्ला बनवण्यासाठी साहित्य

किल्ला बनवण्यासाठी लाल किंवा काळी माती, लहान-मोठे दगड, विटांचे तुकडे, पुठ्ठा किंवा लाकडी फळी, पाणी, गवत आणि छोटी रोपटी, भगवा ध्वज, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, मावळ्यांच्या मूर्ती, किल्ल्याच्या सजावटीसाठी वाळू आणि खडी, कार्डबोर्ड इत्यादी गोष्टी/ साहित्य लागतात.

Materials for building a fort | pinterest

मातीचा किल्ला कसा बनवावा?

सर्वप्रथम किल्ला बनवण्यासाठी घरातील मोकळी जागा निवडा. अंगण, गॅलरी किंवा मोठ्या लाकडी पाटावर तुम्ही किल्ला तयार करू शकता. त्यानंतर पुठ्ठा किंवा लाकडी फळीवर मातीचा थर पसरवा. त्यानंतर मातीमध्ये थोडे पाणी मिसळून ती घट्ट करा. किल्ल्याचा पाया मजबूत करण्यासाठी विटांचे तुकडे आणि दगडांचा वापर करा.

How to make a mud fort? | pinterest

किल्ल्याची रचना

किल्ल्याला उंची देण्यासाठी मातीचा वापर करून डोंगरासारखा आकार तयार करा. काही ठिकाणी मोठे दगड लावून नैसर्गिक डोंगराचा आभास निर्माण करता येतो. मातीचा प्रत्येक थर व्यवस्थित दाबून घ्या. किल्ल्याच्या चारही बाजूंना गोलाकार किंवा चौकोनी बुरुज तयार करा. त्यानंतर बुरुजांना जोडणारी तटबंदी बनवा.

Fort structure | pinterest

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यासाठी कार्डबोर्ड, माती किंवा विटांचे छोटे तुकडे वापरा. प्रवेशद्वाराला कमानीचा आकार देता येईल. प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी मातीचा रस्ता तयार करा.

The main entrance of the fort | pinterest

किल्ल्याच्या आतील भागाची सजावट

किल्ल्याच्या आत राजवाडा, मंदिर, पाण्याची टाकी, तलाव आणि बाजारपेठ यांची छोटी प्रतिकृती तयार करा. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या मूर्ती ठेवा. यामुळे किल्ला अधिक आकर्षक दिसेल. किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी भगवा ध्वज लावा. आजूबाजूला छोटी झाडे, गवत आणि खडी लावून किल्ल्याला नैसर्गिक स्वरूप द्या.

Interior decoration of the fort | pinterest

दिवाळीत कोणते ऐतिहासिक किल्ले बनवता येतील?

रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, सिंहगड किल्ला, राजगड किल्ला, पुरंदर किल्ला बनवायला नक्की शिका.

Which historical forts can be built during Diwali? | pinterest

दिवाळीत किल्ला बनवण्याचे महत्त्व

दिवाळीत किल्ला बनवण्याची परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. या परंपरेमुळे मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याची माहिती मिळते.मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो. माती आणि इतर साहित्य वापरल्यामुळे हस्तकौशल्य विकसित होते.

Importance of building a fort during Diwali | pinterest

NEXT : रोज कुल्हडमधील चहा पिताय? सावधान! चवीला भारी पण आरोग्यासाठी घातक, वाढतात 'या' ५ समस्या

Kulhad chai | AI PHOTO
येथे क्लिक करा...