Diwali 2026 : यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

Shreya Maskar

दिवाळी २०२६

२०२६ मध्ये दिवाळी नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी संपत्ती, धनाची पूजा केली जाते.

Diwali 2026 | pinterest

लक्ष्मी पूजन कधी?

यंदा लक्ष्मी पूजन 8 नोव्हेंबर 2026 ला (रविवार) आले आहे. अमावस्या तिथी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११:२७ वाजता सुरू होऊन ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२:३१ वाजता समाप्त होते.

Lakshmi Puja | pinterest

लक्ष्मी पूजन

लक्ष्मीपूजनला देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि काही परंपरांमध्ये कुबेर यांचे पूजन केले जाते. व्यापारी वर्गात नवीन हिशोबाच्या वह्या, तिजोरी आणि व्यवसायाच्या साधनांची पूजा करण्याचीही प्रथा आहे.

Lakshmi Puja | pinterest

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, मुंबईत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७ असा आहे. तर पुण्यातील लोकांसाठी सायंकाळी ६:२४ ते रात्री ८:२४ हा मुहूर्त आहे. शहरानुसार सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळेत फरक असल्याने पूजेच्या मुहूर्तात काही मिनिटांचा फरक पडू शकतो.

timing of Lakshmi Puja | pinterest

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व

देवी लक्ष्मी ही धन, ऐश्वर्य, सौभाग्य आणि समृद्धीची देवता आहे. दिवाळीच्या अमावस्येला देवी लक्ष्मीचे पूजन केल्याने घरात सुख-शांती, आर्थिक स्थैर्य आणि भरभराट येते, अशी श्रद्धा आहे.

Importance of Lakshmi Puja | pinterest

लक्ष्मी पूजन विधी

सर्वप्रथम भगवान गणेशाची पूजा करावी. त्यानंतर देवी लक्ष्मीला हळद-कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करून लक्ष्मी मंत्राचा जप करावा. देवी लक्ष्मी व भगवान गणेशाची आरती करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

Lakshmi Puja Ritual | pinterest

इतर दिवस

8 नोव्हेंबर 2026 ला नरक चतुर्दशी देखील आहे. तर 10 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा आहे. तसेच 11 नोव्हेंबरला भाऊबीज आहे.

Bhaubij | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

White vs Yellow Ghee | AI PHOTO
येथे क्लिक करा...