Diwali Diya Vastu Tips : दिवाळीत घरात कोणत्या दिशेला पणती- दिवे लावणे शुभ? देवी लक्ष्मीची कृपा राहील, पैशांची भरभराट होईल

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारापासून देवघरापर्यंत पणत्या, दिवे लावले जातात. वास्तुशास्त्रानुसार, दिवे ठेवण्याची योग्य दिशा जाणून घ्या. देवी लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहील.

Diwali | pinterest

दिवाळीत दिवे का लावतात?

अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून दिवे लावले जातात. दिव्यांनी घर उजळून निघते. नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. समृद्धीचे स्वागत होते.

Why lights are lit in Diwali? | pinterest

ईशान्य दिशेला दिवा लावणे शुभ

ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा. ही दिशा पूजेसाठी आणि आध्यात्मिक कार्यांसाठी शुभ मानली जाते. देवघरात किंवा पूजेच्या जागी दिवा लावण्यासाठी ही दिशा निवडली जाते.

light a lamp in the north-east | pinterest

पूर्व दिशेला दिवा लावण्याचे महत्त्व

पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची दिशा असल्याने तिला नवीन सुरुवात, प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. सकाळच्या पूजेसाठी पूर्व दिशेला दिवा लावा. दिवाळीच्या सजावटीसाठी पूर्वेकडील खिडकी किंवा प्रवेशभागात पणत्या लावता येतात

lamp in the east direction | pinterest

उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ

उत्तर दिशा ही कुबेराशी आणि धन-समृद्धीशी संबंधित मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने आर्थिक समृद्धी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Lighting a lamp in the north direction | pinterest

घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा का लावतात?

दिवाळीत घराच्या प्रवेशद्वारावर पणत्या लावा. मुख्य दरवाजा स्वच्छ करून दोन्ही बाजूंना दिवे लावणे शुभ मानले जाते. प्रवेशद्वारावर प्रकाश असणे हे स्वागत, आनंद आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते.

door of the house | pinterest

कोणत्या दिशेला दिवे लावू नये?

दक्षिण दिशा, अंधारे आणि अस्वच्छ कोपरे या ठिकाणी दिवाळीत पणती- दिवे लावू नये.

wrong direction | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : जुन्या साडीपासून बनवा स्टायलिश ब्लाउज, पाहा ७ लेटेस्ट डिझाइन्स; सगळ्यांच्या नजरा फक्त तुमच्यावरच खिळतील

Old Saree Blouse | AI PHOTO
येथे क्लिक करा...