Shreya Maskar
घरात आईची, आजीची किंवा स्वतःची एखादी जुनी साडी असेल, तर ती फेकून देण्याऐवजी त्यापासून सुंदर आणि ट्रेंडी ब्लाउज शिवून घेता येऊ शकतो.
विशेषतः पैठणी, बनारसी, सिल्क, कांजीवरम किंवा भरजरी साडीच्या कापडापासून तयार केलेले ब्लाउज सण-समारंभात आकर्षक दिसतात. दिवाळी, लग्नसमारंभ, साखरपुडा किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी हे डिझाइन्स बेस्ट आहेत.
जुन्या साडीच्या सुंदर बॉर्डर किंवा प्रिंटेड कापडापासून पफ स्लीव्ह ब्लाउज तयार करता येतो. फुगलेल्या बाह्या आणि फिटिंगचा ब्लाउज पारंपरिक साडीला आकर्षक लुक देतो.
साधा पण एलिगंट लूक हवा असेल, तर बोट नेक ब्लाउज निवडा. जुन्या साडीच्या पदरावरील नक्षीचा वापर गळ्याजवळ केल्यास ब्लाउज अधिक सुंदर दिसतो. पैठणी आणि बनारसी साड्यांसोबत हे डिझाइन खुलून दिसते.
जुन्या भरजरी साडीपासून डीप बॅक नेक ब्लाउज शिवून घेता येतो. मागील बाजूस दोरी, टॅसल्स किंवा साडीच्या बॉर्डरची सजावट केल्यास डिझाइन अधिक आकर्षक दिसते.
जुन्या साडीच्या कापडापासून कॉलर नेक ब्लाउज तयार करता येतो. कॉलरवर साडीच्या बॉर्डरचा वापर केल्यास वेगळा आणि स्टायलिश लुक मिळतो. विशेषतः साध्या सिल्क साडीसोबत हे डिझाइन सुंदर दिसते.
साडीच्या कापडावर सुंदर नक्षीकाम असेल, तर हाय नेक ब्लाउज विशेष उठून दिसतो. गळ्याभोवती साडीच्या बॉर्डरचा वापर करून त्याला रॉयल लुक देता येतो. हा ब्लाउज पैठणी, सिल्क आणि बनारसी साड्यांसोबत छान दिसतो.
जुन्या साडीचा काही भाग दुसऱ्या साडीच्या किंवा जुळणाऱ्या कापडासोबत वापरून कॉन्ट्रास्ट ब्लाउज तयार करता येतो. योग्य रंगसंगतीमुळे जुनी साडीही नव्यासारखी दिसू शकते.