Shreya Maskar
२०२६ मध्ये दिवाळी नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. दिवाळीचा उत्सव साधारणपणे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा/पाडवा आणि भाऊबीज अशा प्रमुख दिवसांमध्ये साजरा केला जातो.
शुक्रवार, 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी संपत्ती, धनाची पूजा केली जाते. या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढली जाते. कंदील लावला जातो.
8 नोव्हेंबर 2026 ला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन आहे. या दिवशी घर दिव्यांनी सजवले जाते. तसेच देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. अमावस्या तिथी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११:२७ वाजता सुरू होऊन ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२:३१ वाजता समाप्त होते.
ज्योतिषशास्त्रानुसार, मुंबईत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७ असा आहे. शहरानुसार सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळेत फरक असल्याने पूजेच्या मुहूर्तात काही मिनिटांचा फरक पडू शकतो.
दिवाळीच्या अमावस्येला देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. घराची स्वच्छता करून, पणत्या व दिवे लावून लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात, व्यवसायातील पूजन करण्याचीही परंपरा आहे.
10 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा आहे. दीपावली पाडवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
11 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आहे. या दिवशी बहिण-भाऊ एकमेकांना गिफ्ट देतात. एकमेकांचे रक्षण करण्याचे वचन देतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.