Tanvi Pol
२७ फेब्रुवारीला दरवर्षी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो.
मात्र तुम्हाला मराठी भाषेचे अनोखे वैशिष्ट्ये माहिती आहे का?
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन तर काहीजण मराठी राजभाषा दिन असे सुद्धा म्हणतात.
सुमारे ८ ते ८.५० कोटी लोक मराठी बोलतात.
मराठी ही जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
मराठीत अशी खास विशेषण आणि क्रियापद रचना आहे, जी इतर भाषांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
तमाशा, भारूड, लावणी आणि लोकनाट्ये हे मराठी भाषेचे सांस्कृतिक वैभव आणि पारंपारिक वैशिष्ट्य आहेत.