Dhanshri Shintre
महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ-N आता लेव्हल-२ ADAS सह सुसज्ज असून, यामध्ये १० सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत.
नवीन अपडेच्यामते, स्कॉर्पिओ-Nच्या नव्या Z8L मॉडेलमध्ये लेव्हल-2 ADAS चे 10 फीचर्स व दोन इंजिन पर्याय मिळतात.
नवीन ADAS स्कॉर्पिओ-Nची एक्स-शोरूम किंमत ₹२१.३५ लाख असून, यामध्ये अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
Mahindra Scorpio-N Z8L आता ६ व ७ सीटर पर्यायांत उपलब्ध असून, मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळतो.
ही SUV 2WD व ४x४ पर्यायांत उपलब्ध असून, २ लिटर टर्बो पेट्रोल किंवा २.२ लिटर डिझेल इंजिनमध्ये खरेदी करता येते.
लेव्हल २ ADAS सिस्टीममध्ये १० स्मार्ट फीचर्स आहेत, ज्यात फॉरवर्ड कोलिजन वार्निंग आणि लेन डिपार्चर वॉर्निंग समाविष्ट आहेत.
स्कॉर्पिओ-एनमध्ये २.० लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे २०० bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क देते.