Surabhi Jayashree Jagdish
अस्वच्छ उशी वापरल्यामुळे पिंपल्स येण्याचा धोका खूप वाढतो. त्वचेचा थेट संपर्क अशा उशीशी आल्याने इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ आणि पिंपल्स वाढतात
अनेक आठवडे पिलो कव्हर न बदलल्यास त्यात बॅक्टेरिया साचतात. हे बॅक्टेरिया त्वचेला हानिकारक ठरतात. त्यामुळे त्वचेची समस्या वाढण्याची शक्यता असते.
उशीवर साचलेले तेल आणि घाण चेहऱ्यावर लागते. यामुळे त्वचेची छिद्रं बंद होतात. छिद्र बंद झाल्याने पिंपल्स तयार होतात.
कडक कॉटनच्या उशीवर झोपल्याने त्वचेला घर्षण होतं. या घर्षणामुळे Acne Mechanica म्हणजेच पिंपल्स वाढतात. यामुळे त्वचा अधिक संवेदनशील आणि त्रासदायक होते.
केसांना लावलेलं तेल किंवा शॅम्पूचं केमिकल उशीवर लागतं. हे घटक नंतर त्वचेच्या संपर्कात येतात. त्यामुळे पिंपल्स वाढण्याची शक्यता अधिक होते.
या समस्यांपासून वाचण्यासाठी नेहमी स्वच्छ उशी वापरावी. पिलो कव्हर नियमितपणे धुवावे आणि बदलावं. यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.
झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुणे खूप गरजेचे आहे. Silver-ion तंत्रज्ञान असलेले antimicrobial पिलो कव्हर वापरता येतात. हे बॅक्टेरिया वाढू देत नाहीत आणि त्वचा सुरक्षित ठेवतात.