Manasvi Choudhary
हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ले जातात. आरोग्यासाठी गुणकारी डिंकाचे लाडू घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
डिंक लाडू खाल्ल्याने शरीराला उर्जा आणि ताकद मिळते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डिंकाचे लाडू खाल्ले जातात.
डिंकाचे लाडू बनवण्यासाठी डिंक, साजूक तूप, सुके खोबरे, खारीक पावडर, गूळ, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, सुंठ हे साहित्य एकत्र करा.
डिंक लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढईत साजूक तूपामध्ये डिंक तळून घ्या नंतर तळलेला डिंक एका प्लेटमध्ये थंड करा.
पुन्हा याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस आणि खसखस सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या. नंतर डिंक आणि खोबरे दोन्ही एकत्र करा
कढईत तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्या खारीक पावडर सुद्धा तूपामध्ये परतून घ्या.
गॅसवर कढईमध्ये साजूक तूप आणि बारीक चिरलेला गूळ घाला. आता हे संपूर्ण मिश्रण एकत्र करा.
मिश्रणाचे गोल आकारात लाडू वळून घ्या अशाप्रकारे घरीच साजूक तूपातील डिंकाचे लाडू तयार होतील