Manasvi Choudhary
आंबट- गोड दही खायला सर्वानाच आवडते. अनेक पदार्थामध्ये दही मिक्स करून खाल्ला जातो. अनेकजण उपवासामध्ये दहीचे सेवन करतात.
दहीपासून अनेक चविष्ट रेसिपी बनवल्या जातात त्यापैकी दोन म्हणजे कढी पकोडा आणि दही भेंडी. तुम्ही देखील घरी या रेसिपी सहज बनवू शकता.
कढी पकोडा पंजाबमध्ये प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. कढी पकोडा घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
कढी पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका भांड्यात बेसन, मीठ, हळद, तिखट आणि पाणी घालून पकोड्याची पेस्ट तयार करा. या मिश्रणाचे पकोडे तळून घ्या
पकोडे तळल्यानंतर दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये जिरा, कांदा, टोमॅटो, मिरची, मसाले चांगले परतून घ्या. त्यात तळलेले पकोडे मिक्स करून दही मिक्स करा. संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
या मिश्रणात वरतून कढीपत्ता घाला म्हणजेच घरच्या घरी स्पेशल कढी पकोडे तयार होतील.
दही भेंडी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, लाल मिरची आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. या मिश्रणात मीठ, मसाला आणि हळद मिक्स करा.
मसाला शिजला की त्यात चिरलेली भेंडी मिक्स करा. नंतर या मिश्रणात दही मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
अशाप्रकारे घरच्या घरी दही भेंडी तयार होईल जी तुम्ही फॅमिलीसोबत सर्व्ह करू शकता.