Siddhi Hande
सध्याच्या काळात सर्वकाही डिजिटल झाले आहे. युपीआयद्वारे अवघ्या काही मिनिटात पैसे पाठवू शकतो.
परंतु अनेकांचे फक्त एकच अकाउंट असते. तेच अकाउंट यूपीआयशीदेखील जोडलेले असते.
यामुळे तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. तुम्ही एकाच अकाउंटमध्ये पैसे ठेवणे जोखमीचे ठरु शकते.
तुम्हाला तुमच्या डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी सेव्हिंग अकाउंट वेगळे ठेवणे गरजेचे आहे.
तुम्ही दोन वेगवेगळे अकाउंट मेंटेंन करा. यामध्ये एक डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी वापरा. दुसरे अकाउंट तुमच्या सेव्हिंगसाठी वापरा.
तुमच्या प्रायमरी अकाउंटमधून जर वारंवार पेमेंट होत असेल तर तुमचा किमान बॅलेन्स कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सेकंडरी अकाउंट झिरो मिमिमम बॅलेन्स असलेले ओपन करा.
तुम्ही एका अकाउंटमधील पैसे सेव्ह करु शकतात. फक्त तुमच्या सेकंडरी अकाउंटमधील पैसे वापरु शकतात. यामुळे तुमचे जास्तीत जास्त पैशांची बचत होऊ शकते.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही