Alisha Khedekar
पोट साफ न झाल्यास गॅस आणि पोट फुगल्यासारखे वाटू शकते. यामुळे दिवसभर अस्वस्थता जाणवते.
मल कठीण असल्यामुळे शौच करताना जास्त जोर लावावा लागतो. हे बद्धकोष्ठतेचे सामान्य लक्षण मानले जाते.
मल आत साचल्यामुळे पोटात दुखणे, कळ येणे किंवा सतत जडपणा जाणवू शकतो.
दिवसभर पुरेसे पाणी न घेतल्याने मलातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तो कठीण होऊ शकतो.
व्यायाम किंवा शारीरिक हालचाल कमी असल्यास पचनक्रिया मंदावू शकते. दररोज थोडे चालणे फायदेशीर ठरू शकते.
आयुर्वेदात त्रिफळाचा उल्लेख पचनासाठी केला जातो. मात्र नियमित वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा