ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळच्या वेळेस हेल्दी नाश्ता केल्यास शरिर पूर्ण दिवस एनर्जेटीक राहते. काहि लोक नाश्तामध्ये ओट्स, पोहे, उपमा, अंडी, फळे, ड्राय फ्रुट्स किंवा स्मूदीचा समावेश करतात. तर काही लोक दररोज पोहेच खातात म्हणून आता वेगळेपणासाठी सहा दिवस पोह्यांच्या सहा रेसिपी ट्राय करुन बघा.
कांदा पोहे ही डिश झटपट बनण्यामधील एक आहे. यात कांदा, टॉमेटो, हळद, राई, कढिपत्ता आणि लिंबाचा रस टाकून तळून घ्या. ह्या पोह्यांना महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात जास्त पसंती दिली जाते.
इंदौरी पोहे ही प्रसिद्ध डिश आहे. जे सॉफ्ट टेक्सचर आणि गोड स्वादकरिता ओळखले जाते. तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी इंदोरी पोहे झटपट बनवू शकता. यात शेव, दाणेदार शेंगदाणे, गोड चटणी आणि लिंबाचा रस टाकून सर्व केले जाते आणि वरून डोंबिनाचे दाणे टाकले जातात ज्याने स्वाद अधिक चांगला लागतो.
जर तुम्हाला स्पायसी फ्लेवर आवडत असेल तर मसाले पोहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यात टॉमेटो सॉस, चाट मसाला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून बनवले जाते. हे पोहे ऑफिस किंवा टिफिनकरिता नेऊ शकता.
तुम्हाला हेल्दी पोहे खायचे असतील तर, व्हेजीटेबल पोहे ट्राय करुन बघा. या पोह्यात तुम्ही गाजर, मटार, शिमला मिरची आणि टॉमेटो यांसारख्या तुम्हाला हव्या असणाऱ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. भाज्या टाकल्याने पोहे स्वादिष्ट तर होतीलच, पण सोबतच शरिरीला फायबर आणि व्हिटामिन सुध्दा मिळेल.
मिक्स अंकुरित पोहे बनविण्याकरिता पोहे धुवून ५ मिनिटे भिजत ठेवा. कढईत तेल गरम करा, त्यात राई, कढिपत्ता, कांदा, टॉमेटो आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या. आता मोड आलेले मुग, चणे आणि पोहे टाकून मीठ आणि हळद टाकून मिक्स करा. शेवटी लिंबूचा रस आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
जे लोक सकाळी भरपेट नाश्ता करतात ज्यांना प्रोटिनची गरज असते अशा लोकांसाठी पीनट पोहे एक बेस्ट ऑप्शन आहे. यात सामान्य पोह्यांपेक्षा जास्त प्रमाणात शेंगदाणे टाकले जातात त्याने पीनट पोह्यांचा स्वाद अधिक चांगला लागतो. तसेच हलके मसालेसुध्दा टाकावे त्याने छान मसाल्यांचा फ्लेवर येतो.