ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलू पराठा ही डिश सगळ्यांचीच फेव्हरेट डिश आहे. आलू पराठा हा वेगवेगळ्या पध्दतीने बनवता येतो. यात बटाटा तसेच अनेक प्रकारचे मसाले घातले जातात.
पनीर बारिक करुन चपाती वर टाकले जाते आणि वरुन सर्वे मसाले कोथिंबिर टाकली जाते. अशा पध्दतीने पनीर पराठा बनवला जातो. पनीर पराठा हा बहुतेक लोकांसाठी एक लोकप्रिय पर्याय आहे.
हिवाळ्यात लोक गोभी पराठे देखील एकदम चवीने आवडीने खातात. गोभी पराठा बहुतेकदा दही किंवा चटणीसोबत खातात.
कांद्या एकदम बारिक कापून घ्या त्यात मसाले टाका आणि सगळं मिक्स करुन घ्या. नंतर मोठी पोळी लाटून मिश्रण त्यात भरा. कांद्याचा पराठासुध्दा लोक आवडीने खातात.
मुळ्याचा पराठा कमी लोकप्रिय आहे, पण बरेच लोक तो आवडीने खातात. तो खूप चविष्ट देखील आहे.
हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या मेथीच्या पानांचा वापर पराठे बनवण्यासाठी देखील केला जातो. मेथीची पाने उकळून पीठात मिसळून पराठे बनवले जातात. मेथीचा पराठा अप्रतिम लागतो.
लोकांना मटर पराठा खायला खूप आवडते. हा पराठा मटारच्या दाण्यांना उकळवून बनवला जातो.
मेथीप्रमाणेच पालकाचा वापर पराठ्यांमध्येही केला जातो. हिवाळ्यात पालक मुबलक प्रमाणात आढळतो आणि लोक त्याचे पराठे खाण्यास पसंत करतात.