Manasvi Choudhary
आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे.
घर, शाळा, कार्यालय या व्यतिरिक्त रूग्णालयात ५ विविध रंगाची डस्टबिन असतात.
सॅनिटरी नॅपकिन,बेबी डायपर,एक्सपायरी झालेले मेडिसिन्स म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट टाकण्यासाठी काळ्या रंगाचा डस्टबिनचा वापर केला जातो.
उरलेले जेवण, भाज्यांच्या साली, फळे, फुले या प्रकारचा ओला कचरा टाकून देण्यासाठी हिरव्या रंगाचा डस्टबिन वापरला जातो.
चेहऱ्यासाठी वापरलेले टिश्यू, बाळाची नाळ, मलमपट्टी टाकून देण्यासाठी पिवळ्या रंगाचा डस्टबिन वापरतात.
पॅथॉलॉजी आणि ऑपरेशन थिएटरमध्ये वापरणाऱ्या गोष्टी तसेच रक्ताच्या पिशव्या, युरीन बॅग्स, सीरिंज, आयव्ही सेट लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात.
सुका कचरा टाकण्यासाठी निळ्या रंगाचा डस्टबिन वापरला जातो.