ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पासपोर्ट हा केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक कागदपत्र नाही तर तो प्रत्येक व्यक्तीसाठी एक वैध ओळखपत्र देखील आहे.
पासपोर्टशिवाय कोणत्याही देशात प्रवेश करता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला परदेशात जायचे असेल तर प्रथम पासपोर्ट आणि नंतर त्या देशाचा व्हिसा आवश्यक आहे.
हॅनली पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार, भारतीय पासपोर्ट जगात ८५ व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत, देशांना त्यांच्या व्हिसा-मुक्त प्रवेशाच्या आधारावर ठरवले जाते.
भारत सरकार पांढऱ्या, मरून, नारंगी आणि निळ्या रंगाचे पासपोर्ट जारी करते. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रंगांच्या पासपोर्टची वैशिष्ट्य सांगणार आहोत.
अधिकृत कामासाठी परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना पांढरा पासपोर्ट दिला जातो. पांढऱ्या रंगाच्या पासपोर्ट धारकांना व्हीआयपी प्रोटोकॉल मिळतो.
भारतीय डिप्लोमॅट, आयएएस आणि आयपीएस श्रेणीतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना मरून रंगाचे पासपोर्ट दिले जातात.
ज्या भारतीय नागरिकांनी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे त्यांना भारत सरकार केशरी रंगाचा जारी करते.
सामान्य भारतीयांना सरकारी अधिकारी आणि डिप्लोमॅटपासून वेगळे ओळख देण्यासाठी निळ्या रंगाचे पासपोर्ट दिले जातात.