Surabhi Jayashree Jagdish
पेट्रोल भरायला गेल्यावर अनेकजण स्पीड भरताना तुम्ही पाहिलं असेल. पण स्पीड आणि पेट्रोलमध्ये काय फरक आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? आज आपण हा फरक जाणून घेऊया.
साध्या शब्दांत सांगायचं तर नॉर्मल पेट्रोल हे रोजच्या वापरातील गाड्यांसाठी योग्य असतं. बाईक, कार आणि साध्या इंजिनसाठी वापरलं जातं. सर्वसामान्य लोकांसाठी हा सर्वात कॉमन आणि किफायतशीर पर्याय आहे.
स्पीड पेट्रोल खास करून इंजिनची स्वच्छता आणि चांगलं परफॉर्मन्स मिळवण्यासाठी बनवलं जातं. यामुळे गाडी अधिक स्मूथ चालते आणि इंजिनवरचा ताण कमी होतो.
लाँग ड्राइव्ह किंवा जास्त वापरासाठी हे उपयुक्त ठरतं.
नॉर्मल पेट्रोलचं ऑक्टेन लेव्हल साधारण 91 असतं. तर स्पीड पेट्रोलमध्ये 93 ते 97 पर्यंत ऑक्टेन असतं. जास्त ऑक्टेनमुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते.
स्पीड पेट्रोलमध्ये खास क्लिनिंग एजंट्स मिसळतात. हे इंजिनमधील घाण आणि कार्बन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे इंजिन अधिक काळ चांगल्या स्थितीत राहतं.
स्पीड पेट्रोलमुळे इंजिनमध्ये होणारं Knocking कमी होतं. यामुळे इंजिनचा आवाज कमी आणि ड्रायव्हिंग अधिक स्मूथ होतं. विशेषतः हाय-स्पीड ड्रायव्हिंगसाठी हे फायदेशीर असतं.
प्रीमियम क्वालिटीमुळे स्पीड पेट्रोल नॉर्मलपेक्षा महाग असतं. साधारण 5 ते 10 रुपये प्रति लिटर जास्त खर्च येतो. पण त्याबदल्यात इंजिनची काळजी आणि परफॉर्मन्स सुधारतो.