ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिमला मिरचीची भाजी जवळपास प्रत्येक घरात बनवली आणि खाल्ली जाते. ती खूप फायदेशीर असते आणि चवीलाही स्वादिष्ट लागते.
शिमला मिरची तीन रंगांमध्ये मिळतात. हिरवे, लाल आणि पिवळे. शिमला मिरचीचे हे तिन्ही रंग भारतात उपलब्ध आहेत.
हिरव्या रंगाची शिमला मिरची कमी पिकलेली असते. हि चवीला हलकीशी तिखट आणि कडू लागते.
हिरव्या शिमला मिरचीमध्ये कॅलेरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते. हि मिरची लोक जास्त प्रमामात खातात.
हिरव्या पेक्षा जास्त प्रमाणात पिवळी मिरची पिकलेली असते. ही पिवळी मिरची पिझ्झामध्ये टाकली जाते.
पिवळी मिरची चवीला हलकीशी गोड आणि क्रंची असते. यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते
लाल मिरची सगळ्यात जास्त प्रमाणात पिकलेली असते. ही मिरची चवीली गोड आणि ज्यूसी असते.
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बीटा-कॅरोटीन असतात. ही व्हिटॅमिन डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
तुम्ही कोणतीही सिमला मिरची खाऊ शकता .हिरवी, पिवळी किंवा लाल. या तिन्ही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.