ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नीर डोसा हा अतिशय पातळ, कुरकुरीत आणि हलका डोसा आहे. हि डिश प्रामुख्याने कोकण व दक्षिण भारतीय भागात लोकप्रिय आहे.
तांदळाचे पीठ, १ कप मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार आणि तेल इ. साहित्य लागते.
तांदुळ ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत टाका. ८ ते ९ तास तांदुळ भिजू द्या. सकाळी उठल्यावर तांदळातले पाणी काढून टाका.
मोठे मिक्सरचे भांडे घ्या. त्यात तांदूळ, ओला नारळ, मीठ आणि पाणी टाकून मिश्रण एकदम बारिक गुळगुळीत वाटून घ्या. हळूहळू पाणी घालून अतिशय पातळ, पाण्यासारखे पीठ तयार करा.
तयार केलेले पीठ किमान १५ ते २० मिनिटे तसेच ठेवून द्या. पीठ मुरल्यास ते अधिक चांगले लागते. पॅनवर डोसा टाकण्याआधी पीठ पुन्हा एकदा हलवून घ्या.
नॉन-स्टिक किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करा. तवा खूप गरम किंवा थंड नसावा.तव्यावर हलकेसे तेल लावून घ्या.
पीठाचा चमचा भरुन घ्या आणि तव्याच्या कडेकडून मध्यभागी पीठ सोडा. पीठ पाण्यासारखे असल्यामुळे डोसा आपोआप पसरतो. नीर डोसा हा पातळ असायला हवा.
तव्याच्या बाजूने डोशाच्या कडांवर थोडं तेल सोडा. मध्यम आचेवर डोसा कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्या. नीर डोसा हा फक्त एकाच बाजूने भाजला जातो.
नारळाची चटणी किंवा हिरवी कोथिंबीर चटणी सोबत तुम्ही हा डोसा खाऊ शकता.
नीर डोसा करताना पीठ नेहमी खूप पातळ ठेवावे. तसेच प्रत्येक डोसा टाकण्याआधी पीठ हलवून घ्या.