ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा आपण बाजारातून कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट छापलेली असते.
प्रत्येक अन्नपदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ज्यावरून आपण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की खराब झाले आहे हे समजू शकतो.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर बेस्ट बिफोर डेट आणि एक्सपायरी डेट छापलेली असते. पण याचा अर्थ काय, जाणून घ्या.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बेस्ट बिफोर डेट आणि एक्सपायरी डेटमध्ये काय फरक आहे, जाणून घ्या.
बऱ्याच लोकांना असे वाटते की, एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर डेट यांचा अर्थ एकच आहे. परंतु असे नाही.
बेस्ट बिफोर डेट सांगते की अन्नाची चव आणि सुगंध किती काळ ताजे राहील. जर कोणत्याही अन्नपदार्थाची बेस्ट बिफोर डेट संपली असेल तर याचा अर्थ असा की ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
जर कोणत्याही अन्नपदार्थाची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते आता खाण्यायोग्य नाही आणि जर ते खाल्ले याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.