ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैली यामुळे डायबिटीज सारख्या आजारांचा धोका वाढत चालला आहे.
परंतु, तुम्हाला माहितीये का, डायबिटीज आणि प्री डायबिटीजमध्ये नक्की काय फरक आहे, जाणून घ्या.
डायबिटीज आणि प्री डायबिटीज हे दोन्हीही ब्लड शुगर लेव्हलशी संबधित आजार आहेत.
डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते.
डायबिटीजमध्ये जर रक्तातील साखरेवर नियंत्रणात नाही आली तर याचा परिणाम किडनी, डोळे आणि हार्टवर होऊ शकतो.
प्री डायबिटीज स्टेजमध्ये रक्तातील साखर हे सामान्यपेक्षा अधिक असते.
प्री डायबिटीज स्टेमजध्ये वेळीच काळजी घेतली तर डायबिटीजवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.