ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोळ्यातून सतत पाणी येणे हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. अनेकदा, हे इन्फेक्शन, अॅलर्जी किंवा डोळे कोरडे पडल्याने देखील डोळ्यातून सतत पाणी येऊ शकते.
डोळ्यामध्ये बॅक्टेरिया किंवा वायरल इन्फेक्शन झाल्यास सूज येऊ शकते, तसेच डोळ्यातून पाणी येऊ शकते.
वेगवेगळ्या अॅलर्जीमुळे देखील डोळ्यातून सतत पाणी येऊ शकते.
जर डोळे सामान्यपेक्षा जास्त कोरडे असतील तरीही डोळ्यातून पाणी येण्याची समस्या होऊ शकते.
पापण्या, कॉर्निया किंवा अश्रू नलिकामध्ये अडथळा निर्माण झाल्याने देखील ही समस्या होऊ शकते.
डोळ्यामध्ये धूळ किंवा बारीक कचरा गेल्याने देखील डोळ्यातून सतत पाणी येऊ शकते.
जर तुमच्या डोळ्यातून सतत पाणी येत असेल त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.