ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर कॅन्सर असल्यास पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना जाणवू शकतात. लिव्हरचा ट्यूमर वाढून नसांवर दबाव येऊ शकतो.
कावीळमध्ये त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसतो. हे रक्तातील बिलीरुबिनच्या वाढत्या पातळीमुळे होते. हे देखील लिव्हर कॅन्सरचे लक्षण आहे.
कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे हे देखील लिव्हरच्या कॅन्सरचे लक्षण आहे.
भूख न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे हे एक गंभीर लक्षण आहे.
ओटीपोटात द्रव किंवा पाणी जमी होऊन पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
जास्त थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे हे देखील लिव्हर कॅन्सरचे लक्षण असू शकते.
लिव्हर कॅन्सर असल्याच त्वचेला सतत खाज सुटणे किंवा त्वचेशी संबधित समस्या होऊ शकतात.