ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुठे ही फिरायला जायचे असेल तर, सर्वात आधी आपण चांगले हॅाटेल बुक कपण्याच्या शोधात असतो.
हॅाटेल किती चांगले आहे,त्याचा अंदाज आपण त्याची रेटिंग बघून ठरवतो. जसे की, १, २, ३, ४ किंवा ५
काही हॉटेल ५ ते जास्त ७ स्टार रेटिंग वाले असतात. या हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. पण तुम्हाला कधी विचार केला आहे का ? नेमका 5 आणि 7 स्टार हॉटेलमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या
5 स्टार हॉटेलमध्ये सगळ्या सुविधा असतात. जसे की, स्पा, जिम, स्विमिंग पूल, लॉन्ड्री आयरनिंग, शू पॉलिश आणि पिलो सिलेक्ट करण्याचा ऑप्शन असतो.
५-स्टार हॉटेल्समध्ये नाश्ता मोफत दिला जातो आणि जेवणाचा बुफे देखील असतो.
5 स्टार हॉटेलमध्ये साफ - सफाईवर आणि सोबतच प्रीमियम पाहुण्यांच्या सेवेकडे विशेष लक्ष दिले जाते.
7 स्टार हॉटेल्स सर्वात आलिशान मानली जातात.येथे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त सौंदर्य, स्वच्छता आणि सुविधा मिळतील.
येथे पाहुण्यांसाठी खास सरप्राईज असतात, ज्यामध्ये रेन शॉवर, जकूझी, रोल्स-रॉइस किंवा खाजगी वाहतूक यांचा समावेश असतो.
7 स्टार हॉटेलमध्ये राहणे शाही अनुभव देते, परंतु ही हॉटेल्स थोडी जास्त महाग असतात.