Saam Tv
भारतात होळी खेळताना कोणताही भेदभाव न करता लोक एकमेकांना भेटून रंग लावतात. कारण भारत हा विविध धर्मांनी नटलेल्या परंपरांचा देश आहे.
काहींना अशा प्रश्न पडतो की, मुघल होळी खेळायचे की नाही. तसेच होळी या शब्दाचा उल्लेख मुघलांमध्ये कधी झालाय का? याचं उत्तर आपण पुढील मुद्यांद्वारे जाणून घेणार आहोत.
मुघलांच्या काळात होळी मोठ्या धामधुमीत साजरी केली जायची. औरंगजेबाच्या कारकिर्दीचा अपवाद वगळता, अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांच्या कारकिर्दीत हिंदू राजे आणि दरबारी एकत्र येऊन होळी खेळायचे.
अकबराच्या काळात फत्तेपूर सिक्री आणि आग्रा या ठिकाणी मोठ्या धाटात होळी खेळली जायची.
तशीच होळी जहांगीरच्या राज्यात खेळतानाचे चित्र आत्ता सुद्धा विकिपीडियावर पाहायला मिळतात.
पुढे शहाजहांच्या काळात होळी औपचारिक झाली होती, मात्र महालामध्ये होळी साजरी करण्यात आली होती.
ईद हा मुस्लिम समुदायाचा एक पवित्र सण आहे जो उर्दू आणि अरबी भाषेत 'आनंद' किंवा 'उत्सव' म्हणून ओळखला जातो.
ज्याप्रमाणे त्याला ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अजहा म्हणतात, त्याचप्रमाणे मुघल काळात होळीचे नाव मुस्लिम सणासारखेच होते.
मुघल काळात होळीला 'ईद-ए-गुलाबी' किंवा 'आब-ए-पाशी' म्हणतात. याचाच अर्थ गुलाबी ईद किंवा पाण्याचा वर्षाव असा होतो.