Shruti Kadam
छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांच्या स्वाधीन करण्यात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचा हात होता, असा दावा छावा चित्रपटात करण्यात आला.
गणोजी आणि कान्होजी शिर्के हे महाराणी येसूबाई यांचे बंधू होते.
गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना शृंगारपूर दाभोळची वतनदारी पाहिजे होती.
वतनदारी देण्यास नकार दिल्यामुळे गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे संगमेश्वरचे ठिकाण मुघल सेनापती मुकर्रब खानास कळवल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच हजारी मनसबदारी बहाल केली.
गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या महत्त्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती.
१६९७ मध्ये झुल्फिकार खानने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवले.
गणोजी शिर्के ह्यांनी वेढा घालणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्यावर मात करून राजाराम राजेंना गणोजींनी सुटका केली.
पुढे गणोजी आणि कान्होजी यांचा मृत्यू कसा झाला, याची ठोस माहिती उपलब्ध नाही.