Bharat Jadhav
स्टायलिश दिसण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे दाढी ठेवतात.
दाढी ठेवल्याने आपला लूक अधिक चांगला होतो. परंतु अकाली वृद्धत्वासारख्या दाढीमुळे आपल्याला बऱ्याच वेळा लाज वाटू लागते.
अकाली दाढी पांढरे होणे ही बऱ्याच लोकांसाठी सामान्य चिंता असू शकते. ही अनुवांशिक प्रक्रिया आहे. पण सध्या तरुणांची दाढी वेळेआधीच पांढरी होऊ लागलीय.
बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी पांढरी दाढी काळी करण्याचा दावा करतात, परंतु काही घरगुती उपाय करूनही तुम्ही तुमची पांढरी दाढी पुन्हा काळी करू शकता.
कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे केसांचा रंग वाढवत असतात.
थोडेसे खोबरेल तेल गरम करा आणि त्यात मूठभर कढीपत्ता घाला. मिश्रण थंड होऊ द्या, मग ते तुमच्या दाढीला लावा. दाढीला हा लेप ३० मिनिटापर्यंत असू द्या, त्यानंतर धुऊन काढा.
आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून दाढीला लावू शकता. ही पेस्ट ३० मिनिटांपर्यंत दाढीला असू द्या, त्यानंतर ते धुवून काढा.
संतुलित डाय केस काळे आणि दाट ठेवत असतात. व्हिटॅमिन बी १२,आयर्न आणि झिंक यासारखे पोषक घटक मिळतात. जे तुमच्या दाढीचा रंग आणि मजबूती करण्यास मोठी भूमिका बजावतात.
तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगा करा. केस अकाली पांढरे होणे हे तणावामुळे होते. हायड्रेटेड राहा आणि केमिकल-आधारित केस उत्पादनांचा वापर टाळा.
येथे क्लिक करा