Loose Motion Remedies : पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाल्ल्याने जुलाब होतायेत? 'हा' घरगुती उपाय मिनिटांत देईल आराम

Shreya Maskar

मीठ-साखर पाणी

तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर एका ग्लासात कोमट पाणी, मीठ आणि साखर मिक्स करा आणि प्या. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.

Salt-sugar water | pinterest

जिरे

एका पॅनमध्ये पाणी टाका आणि त्यात जिरे उकळून घ्या. पाणी अर्धे झाल्यावर ते थंड करून दिवसातून २- ३ वेळा प्या.

cumin | pinterest

नारळ पाणी

जुलाब होत असतील तर नारळ पाणी पिणे हा रामबाण उपाय आहे.नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियम असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करते. यामुळे डिहायड्रेशन टळते.

Coconut water | pinterest

कोथिंबीर- लिंबाचे पाणी

लिंबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जुलाबावर फायदेशीर ठरतात. कोथिंबीरीची पाने अपचनाशी संबंधित त्रासावर रामबाण उपाय आहे. त्यामुळे लिंबाच्या पाण्यात कोथिंबीर घालून प्या.

Coriander- lemon water | pinterest

शिजलेला भात

जुलाब होत असतील तर उकडलेला पांढरा भात पोटासाठी अत्यंत सौम्य असतो. यातील स्टार्चयुक्त गुणधर्मामुळे पचनसंस्थेतील अतिरिक्त पाणी शोषून घेण्यास मदत होते.

Cooked rice | pinterest

आले

आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहे. आल्याचे तुकडे पाण्यात उकळा आणि ते पाणी प्या. यामुळे जुलाब थांबतात.

Ginger | pinterest

पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी?

पावसाळ्यात बाहेरचे जंक फूड, स्ट्रीट फूड खाणे टाळा. तसेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. जास्तीत घरी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्या.

street food | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : उलट्या- जुलाब होतायत? चुकूनही खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा...

Loose Motion | pinterest
येथे क्लिक करा...