ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हल्ली प्रत्येक मुलांना जन्मापासूनच डायपर घातले जाते. ते डायपरमध्येच शी आणि शू करतात. आणि नंतर त्यांना फेकून दिले जाते.
पूर्वी अनेक स्त्रिया आपल्या बाळांना (Baby) लंगोट घालायचे मात्र,आता वेळेनुसार स्त्रिया आपल्या बाळांना डायपर घलातता. जे त्यांना सोयीस्कर पडते.
जर तुम्ही तुमच्या बाळांना सतत डायपर(Diaper) घालत असाल, तर यामुळे बाळांच्या आरोग्यावर काही परिणामही होऊ शकतात.
बाळांना जास्त वेळेपर्यंत डायपर घातल्याने रॅशेस येऊ शकतात.
जास्त वेळेपर्यंत डायपर घातल्याने डायपरमधल्या केमिकलमुळे स्कीन एलर्जी होऊ शकते.
जास्त वेळ डायपर घातल्याने लहान मुलांना युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
डायपर घालायला मुलांना आवडत नाही. यामुळे ते सतत रडतात. आणि चिडचिड करतात.
बऱ्याच स्त्रिया मुलांना डायपर घालून झोपवतात. सूसूच्या ओल्यापणामुळे त्यांची झोप खराब होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.