ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.
ट्रेनने प्रवास करताना लोक अनेक सामान घेऊन जातात. पण ट्रेनमध्ये दारु घेऊन जाऊ शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो.
ट्रेनमध्ये दारू घेऊन जाणे किती सुरक्षित आहे आणि यासाठी रेल्वेचे काय नियम आहेत. जाणून घ्या.
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये दारु घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. कोणत्याही स्वरुपात दारु घेऊन जाणे हा गुन्हा आहे.
जर एखादा व्यक्ती ट्रेनमध्ये दारु घेऊन जाताना पकडला गेला तर भारतीय रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १६५ नुसार कारवाई केली जाऊ शकते.
ट्रेनमध्ये दारु नेल्यास ५०० रुपयांपर्यंतचा दंड आहे. याव्यतिरिक्त, काही प्रकरणांमध्ये प्रवाशाला ६ महिन्यापर्यंतची जेल होऊ शकते.
प्रवासादरम्यान दारु नेले असता तिकिट रद्द होऊ शकते. तसेच दारु पिऊन किंवा कोणत्याही प्रकारचा नशा करुन प्रवास केल्यास तुम्ही रेल्वेन प्रवास करु शकत नाही.
दारु व्यतिरिक्त, गॅस सिलेंडर, स्टोव्ह, फटाके, ज्वलनशील रसायने आणि दुर्गंधीयुक्त वस्तू रेल्वेमध्ये नेण्यास मनाई आहे.