Manasvi Choudhary
डायमंडच्या साडीवर डायमंडचे मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड सध्या आहे. तुम्ही देखील सणासुदीला डायमंडच्या साडीवर नवीन मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर लेटेस्ट डिझाईन्स पाहा.
साडीचा ग्लॅमरस लूक अधिक उठून दिसण्यासाठी योग्य मंगळसूत्राची निवड करणे महत्वाचे आहे. सिंपलपासून मॉडर्न डिझाईन्स मंगळसूत्रामध्ये उपलब्ध आहेत.
सॉलिटेअर पेंडंटचे मंगळसूत्र महिलांमध्ये ट्रेंडमध्ये आहे. काळ्या मण्यांची बारीक डबल चेन आणि मध्ये एक मोठा चककाणारा डायमंड असणारा मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
फुलांच्या आकाराचे डिझाईन असलेली डायमंड मंगळसुत्राची पेंडंट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. यात छोट्या-छोट्या हिऱ्यांची फुले असतात.
वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न डायमंड साड्यांवर मॉडर्न लूक हवा असल्यास इन्फिनिटी डायमंड मंगळसूत्र निवडा.
जर तुम्हाला थोडासा पारंपरिक आणि भरगच्च लूक हवा असेल, तर दोन किंवा तीन लेयर्स असलेली डायमंड चेन मंगळसूत्र निवडा.
गळ्यापाशी तुम्ही शॉर्ट मंगळसूत्र किंवा चोकर स्टाईल डायमंड मंगळसूत्र निवडू शकता.