Manasvi Choudhary
पारंपरिक जेवणात तांदळाची भाकरीला विशेष महत्व आहे. लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वांनाच तांदळाची भाकरी खायला आवडते.
पण अनेकदा मधुमेह असणाऱ्यांना तांदळाची भाकरी खावी की नाही, असा प्रश्न पडतो. यासाठी डायबिटीजचे रूग्ण तांदळाची भाकरी खाऊ शकतात का? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
तांदळाच्या ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळे तांदळाची भाकरी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी ती रोजच्या आहारात खाणे टाळावे.
डायबिटीजच्या रूग्णांना तांदळाची भाकरी खायची असेल तर शुगर चेक करून योग्य प्रमाणात तांदळाच्या भाकरीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
जर तुम्हाला भाकरी खायची असेल तर तांदळाच्या भाकरीऐवजी तुम्ही नाचणी, ज्वारी आणि ओट्सच्या पीठाची भाकरी बनवा.
जर तुम्हाला तांदळाची भाकरी खायची असेल, तर रात्रीच्या वेळी ती खाणे टाळा आणि दुपाच्या आहारात तांदळाच्या भाकरीचे सेवन करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.